मुंबईः आज राज्यात ५ हजार ३३९ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९५. ७१ टक्के झाला आहे. तर, राज्यात सध्या ३४ हजार ८६२ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ()

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोना बाधित रुग्णसंख्येचा आकडा वाढत होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील करोनाची आकडेवारी काहीशी दिलासादायक आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण आणि रिकव्हरी रेटही वाढला आहे.

आज राज्यात ५ हजार ३३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आत्तापर्यंत १९ लाख ४८ हजार ६७४ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेट ९५ . ७१ टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात १ लाख ७८ हजार ६७६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, १,९११ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

गेल्या २४ तासांत २ हजार ७३६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे त्यामुळं राज्यातील एकूण करोना बाधितांचा आकडा २० लाख ३६ हजार ००२ इतका झाला आहे. तर, आज दिवसभरात ४६ करोना बाधितांचा मृत्यू झाला असून करोना बळींचा एकूण आकडा ५१ हजार २१५ इतका झाला आहे. आजपर्यंत राज्यात १ कोटी ४८ लाख २१ हजार ५६१ चाचण्यांपैकी २० लाख ३६ हजार ००२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली

करोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असतानाच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्यांही कमी होताना दिसत आहे. आजच्या तारखेपर्यंत ३४ हजार ८६२ सक्रीय रुग्ण राज्यात असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मुंबईत ५ हजार ६४७, पुण्यात ६ हजार ५४५ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ठाणे जिल्ह्यात १.२६ टक्केच रुग्ण उपचाराधीन
जिल्ह्यातील करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ९६.३१ टक्क्यावर गेला असून गुरुवारी १६५ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत आढळलेल्या एकूण २ लाख ५४ हजार ८९६ रुग्णांपैकी २ लाख ४५ हजार ५०४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या १.२६ टक्के म्हणजेच ३ हजार २२४ रुग्ण उपचाराधीन आहेत. गुरुवारी एकूण रुग्णसंख्येमध्ये २५४ नवीन रुग्णांची भर पडली. तर दिवसभरात ३ रुग्ण दगावल्याने करोनाबळीचा आकडा वाढत ६ हजार १६८ इतका झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर २.४१ टक्के इतका आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here