म. टा. प्रतिनिधी,

मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने उडविल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी (दि. ४) सकाळी साडेपाच वाजता जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेल्या सामनेर गावात घडली. ही धडक इतकी जबर होती की, यात दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. मनीषा साहेबराव पाटील (वय ५० वर्षे) आणि अनिता सहादू पाटील (वय ४८ वर्षे, दोघी रा. सामनेर), अशी या अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.

जळगाव जिल्ह्यातील सामनेर हे गाव जळगाव-पाचोरा रस्त्यावर आहे. या गावातील अनेक स्त्री-पुरुष दररोज मॉर्निंग वॉकला जात असतात. मनीषा पाटील व अनिता पाटील या दोन्ही महिला देखील नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडल्या होत्या. त्या रस्त्यावर फिरत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की एक महिला रस्त्याच्या बाजूला दूरपर्यंत फेकली गेली. तर दुसरी महिला साधारण ५० मीटर अंतरापर्यंत वाहनासोबत फरपटत गेली. या अपघातानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून वाहनासह पलायन केले.

क्लिक करा आणि वाचा-
ही घटना घडल्यानंतर दोन्ही महिलांचे मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी पाचोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, पोलीस हवालदार रामदास चौधरी यांनी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here