मनसेचे सरचिटणीस यांनी एकावर एक ट्विट करत शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शिंदे पहिल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘मुंबईकरांना चांगले रस्ते, बगीचे, शाळा देऊ, असे आश्वासन शिवसेना प्रत्येक महापालिका निवडणुकीत देते… याला म्हणतात टाइमपास.’
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करू, यात शिवसेनेने ३० वर्षे घालवली… याला म्हणतात टाइमपास, असे म्हणत शिंदे यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांना टोल्यावर टोले लगावले आहेत.
मनसे हा नेमका पक्ष आहे की संघटना आहे हेच मला कळत नाही. ही ‘टाइमपास टोळी’ आहे असंच म्हणावं लागेल अशा शब्दांत मनसेवर टीकास्त्र सोडताना आदित्य ठाकरे यांनी मनसेकडे स्वत:चे कार्यकर्ते देखील लक्ष देत नाहीत. त्यामुळं आपणही लक्ष देण्याची गरज नाही,’ असे सांगत मनसेला फार गांभिर्याने घेण्याची आवश्यकता नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी सूचित केले होते. त्यावर मनसेचे कीर्तिकुमार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मनसे नंतर भाजपनेही साधला निशाणा
एकीकडून मनसेने शिवसेनेवर हल्लाबोल केलेला असताना, दुसरीकडून भारतीय जनता पक्षाने देखील मनसेवर टीकेचे अस्त्र उगारले आहे. राम मंदिराच्या वर्गणीला विरोध करायचा आणि सार्वजनिक पदपथावरच्या लोकांकडून हफ्ता वसूल करायचा, अशा शब्दात भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी हा हल्ला चढवला आहे. हफ्ता वसुलीसाठी जर मुख्यमंत्र्यांचा फोटो कुणी वापरला असेल, तर त्याला मुख्यमंत्र्यांचे समर्थन नसेलच. मात्र असा फोटो वापरणाऱ्यांवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी शेलार यांनी करत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times