नागपूर: ‘’चा (Bird Flu) संसर्ग रोखता यावा (prevention of ) यासाठी राज्यभरात आतापर्यंत बाधित क्षेत्रातील ७२ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्याची माहिती राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे नष्ट केलेल्या कोंबडय़ांसाठी शासनाकडून मदत दिली जात असल्याचेही विभागाने सांगितले. ( in the state for )

ज्या भागात ‘बर्ड फ्लू’चे नमुने पॉझिटीव्ह आले त्या भागातील १० किलोमीटरपर्यंतच्या परिसरात तीन महिने पाहणी करण्यात येते. त्यानंतर पुन्हा नमुने घेतले जातात. सध्या असे नमुने गोळा करण्याचे काम सुरू आहे. या काळात जर संसर्ग दिसून आला नाही तर हे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्रातून वगळले जाण्याची घोषणा करण्यात येते.

कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’ने झाल्याचे एकादा का स्पष्ट झाले, की मग संबंधित स्थळापासून एक किलोमीटरचा परिसर नियंत्रित क्षेत्र घोषित करण्यात येतो. त्यानंतर त्या भागातील कोंबडयांसह इतरही पक्षी नष्ट करण्याचे काम केले जाते. अशा प्रकारे आतापर्यंत ७२ हजार १०६ कोंबडय़ा नष्ट करण्यात आल्या आहेत.

नागपूरला दिलासा

दोन आठवडय़ांपूर्वी नागपूर जिल्ह्य़ातील बुटीबोरीजळील एका पोल्ट्री फार्ममधील कोंबडय़ांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आतापर्यंत एकही नमुना सकारात्मक आलेला नाही. हे पाहता नागपूर जिल्ह्य़ातील साथ आता पूर्णपणे आटोक्यात असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

आतापर्यंत २०,१९८ पक्ष्यांचा मृत्यू

८ जानेवारीपासून आतापर्यंत २०,१९८ विविध पक्ष्यांचा ‘बर्ड फ्लू’मुळे मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. असे असले तरी दोन आठवडयांपासून यात घट होत असल्याचे दिलासादायक वृत्तही विभागाने दिले आहे. २ फेब्रुवारी रोजी राज्यात धुळ्यात एकूण ८० कोंबड्यांचा मृत्यू झाला. तसेच सोलापूरमध्ये ३४, अहमदनगरमध्ये १६, तर अकोल्यात एकूण १४ कोंबड्यांचा मृत्यू झाला. म्हणजे या जिल्ह्यांमध्ये एकूण १४४ कोंबडय़ांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here