नवी दिल्लीः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात ( ) शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावरून ( ) माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ( ) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत सुरू आहे. पण त्यांनी शांततेचा मार्ग सोडला तर देशाला मोठ्या संकटचा सामना करावा लागेल, असा इशारा शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

दिल्लीच्या सीमांवर वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत आंदोलन सुरू आहे. पण आंदोलक शांततेचा मार्ग सोडून दुसऱ्या मार्गावर वळले तर संपूर्ण देशाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकार याला जबाबदार असेल. शेतकऱ्यांच्या समस्यांसारखे अनेक मुद्दे आहेत. पण केंद्रातील सत्ताधारी त्याबाबतीत असंवेदनशील झाले आहे, असा घणाघात शरद पवारांनी केला.

शरद पवार यांच्या कन्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही शेतकरी आंदोलनावरून सरकारवर निशाणा साधला. गाझीपूर सीमेवर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आम्ही १० विरोधी पक्षातील खासदार गेलो होतो. पण आम्हाला शेतकऱ्यांची भेट घेऊ दिली नाही. तेथील परिस्थितीही दिशाच्या हिताच्या नव्हती. आपण या आंदोलनावर तोडगा काढायला हवा. ज्या परिस्थितीत करत आहे, ते योग्य नाही. चर्चेद्वारे लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

लोकसभा अध्यक्षांची विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची रात्री बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डीएमकेसह इतर प्रमुख पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. तिन्ही नवीन कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलन या मुद्द्यांवर संसदेत स्वतंत्र चर्चा व्हावी. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावासोबत ही चर्चा घेऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. सरकारने ही मागणी मान्य केली तर आम्ही सभागृहातील चर्चेत सहभागी होऊ, असं काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here