ग्रेटाविरोधात नाही ‘टूलकीट’ बनवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
कुठलीही धमकी किंवा मानवाधिकारांचे उल्लंघन आपल्याला शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याच्या भूमिकेवरून मागे हटवू शकत नाही, असं स्वीडनची पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग दुसरं ट्वीट करत म्हटलं. दिल्ली पोलिसांनी ( ) गुन्हा दाखल केल्यानंतर तिने हे ट्वीट केलं. पण दिल्ली पोलिसांनी ग्रेटाविरोधात गुन्हा दाखल केला नाही. तर भारताच्या बदनामीसाठी ‘Toolkit’बनवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये कुणाचंही नाव लिहिलेलं नाही. हा गुन्हा फक्त ‘Toolkit’बनवणाऱ्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. आणि या प्रकरणी तपास सुरू आहे, अशी माहिती दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त प्रवीर रंजन यांनी गुरुवारी दिली.
शनिवारी देशव्यापी ‘चक्का जाम’
केंद्राच्या ‘कृषी कायद्यां’विरोधात शेतकऱ्यांनी शनिवारी ६ फेब्रुवारीला देशव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलनाचा इशारा दिला आहे. तीन तास हा चक्का जाम चालेल. दुपारी १२ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे चक्का जाम आंदोलन केले जाईल. ही विचारधारेची लढाई आहे. फोन किंवा व्हॉट्सअॅपवरून लढण्याची गरज नाही. ही लढाई कृषी मालाला योग्य भाव मिळवून देण्याची आहे. दिल्ली पोलिसांनी रस्त्यांवर लावलेले सर्व खिळे कापून जाऊ, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला. इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times