म. टा. प्रतिनिधी, वरळी

मुद्रांक शुल्कातील घट तसेच ओसी असल्यास जीएसटी माफी, अशाप्रकारच्या सवलतींमुळे मुंबईत घरांच्या मागणीत जबरदस्त वाढ झाली आहे. याअंतर्गत एका उद्योजकाने एकाच इमारतीत तब्बल ८० कोटी रुपयांचे चार फ्लॅट खरेदी केले आहेत.

वरळी भागातील या टोलेजंग इमारतीतील ३१व्या मजल्यावरील हे फ्लॅट आहेत. डायनॅमिक्स अँड केमिकल्स लिमिटेडचे अध्यक्ष यांनी ही खरेदी केली आहे. एकूण चार फ्लॅट्सची किंमत ८० कोटी ३० लाख रुपये आहे. चार फ्लॅटचे एकूण क्षेत्रफळ १३ हजार ८७८ चौरस फूट आहे. त्याची सरासरी दर हा ५८ हजार ७७ रुपये प्रति चौरस फूट आहे.

वाचा:

चार फ्लॅटपैकी दोन फ्लॅट प्रत्येकी ३०६४ तर दोन फ्लॅट प्रत्येकी ३८७५ चौरस फूट चटई क्षेत्राचे (कार्पेट एरिया) आहेत. यापैकी ३०६४ चौरस फूट क्षेत्रफळाच्या फ्लॅटची किंमत २२ कोटी ५० लाख तर ३०६४ चौरस फूट क्षेत्रफळाच्या फ्लॅटची किंमत १७ कोटी ८० लाख रुपये आहे. या सर्व फ्लॅटसाठी प्रत्येकी तीन वाहनांचे पार्किंग अमित मेहता यांना मिळाले आहे.

वाचा:

के रहेजा समूहाची ‘आर्टेशिया’ ही इमारत एकूण ४५ माळ्यांची आहे. एकीकडे अरबी समुद्र तर दुसरीकडे वांद्रे-वरळी सी लिंक दिसेल, असा हा टॉवर आहे. या टॉवरचा सरासरी दर ६० ते ७० हजार रुपये प्रति चौरस फूट आहे. तर ७.५० लाख प्रति महिना इतके जवळपास भाडे येथील घरांना मिळत असल्याचे काही दलालांचे म्हणणे आहे.

१.६१ कोटींचे

या फ्लॅट्सची खरेदी करताना मेहता यांनी ३१ डिसेंबरला मुद्रांक शुल्क भरले. त्यामुळे त्यांना २ टक्केच मुद्रांक शुल्क भरावे लागले. मात्र या मालमत्तेची नोंदणी २० जानेवारीला करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या जवळपास ८० लाख रुपयांची बचत झाली. या चारही फ्लॅटपोटी त्यांनी १.६१ कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्काचा भरणा केला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here