मुंबई: लॉकडाऊन काळात नागरिकांना आलेल्या वाढीव वीज बिलात सवलत देण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करणाऱ्या भारतीय जनता पक्षावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांनी जोरदार तोफ डागली आहे. ‘पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे दर वाढवून सामान्य माणसाचं कंबरडं मोडणाऱ्या भाजपच्या नेत्यांना वीज बिलाच्या विरोधात आंदोलन करताना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे,’ असा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. ( Attacks BJP)

पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात शिवसेनेनं आज राज्यभर आंदोलन पुकारलं आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून वाढीव वीज बिलांच्या विरोधात भाजपनं आंदोलन सुरू केलं आहे. भाजपची ही भूमिका दुटप्पी असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. ‘एकीकडं भाजपवाले वीज बिलाच्या विरोधात ओरड करताहेत, दुसरीकडं आजच घरगुती सिलिंडरचे भाव २५ रुपयांनी वाढवले आहेत. हा भाजपचा दुटप्पीपणा आहे. आपण काय करतोय हे त्यांना कळलं पाहिजे. पेट्रोलचे दर १०० च्या पुढे गेले आहेत. डिझेल ८५ पार गेलंय. घरगुती गॅसचे दर गगनाला भिडलेत. मध्यमवर्गीय माणसाचं कंबरडं मोडलंय. त्यांचं संपूर्ण बजेट भाजप सरकारनं बिघडवून टाकलंय. असं असताना वीज बिलाचं तुणतुणं वाजवणं हा लोकांचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

वाचा:

‘सर्वसाधारणपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर आपण तेलाचे भाव वाढवतो. आज हे दर २०१४ च्या तुलनेत निम्म्यावर गेलेत. त्यामुळं पेट्रोल, डिझेलचे दर कमी व्हायला पाहिजेत. पण ते वाढवले जात आहेत. तेलाच्या किंमतीवरील करांतून २० लाख कोटी गोळा केले आहेत. हा पैसा गेला कुठे?,’ असा सवालही वडेट्टीवार यांनी केला. ते टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

वाचा:

पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्यासाठी राज्य सरकारनं कर कमी करावा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यांच्या या वक्तव्याचाही वडेट्टीवार यांनी समाचार घेतला. ‘केंद्र सरकारनं कर वाढवत जायचं आणि राज्यानं कमी करायचे. राज्याला खर्च नाही का?,’ असा प्रश्नही त्यांनी केला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here