या अगोदर मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं याला जामीन देण्यास नकार दिला होता. यावरून, उच्च न्यायलयाच्या आदेशाची समीक्षा करण्यात येईल, असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.
सोबतच, अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रोडक्शन वॉरंटलाही सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलीय. मुनव्वर फारुकीविरुद्ध इतर राज्यांत दाखल करण्यात आलेल्या खटले स्थगित करण्यात यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं नोटीस जारी केलीय.
सर्वोच्च न्यायालयात मुनव्वर फारुकीनं एकूण दोन याचिका दाखल केल्या आहेत. एका याचिकेत जामिनावर मुक्ततेची विनंती करण्यात आलीय तर दुसऱ्या याचिकेत वेगवेगळ्या राज्यांत दाखल करणारे खटले एकाच ठिकाणी चालविण्यात यावेत, अशी मागणी मुनव्वरकडून करण्यात आलीय. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम जामीन देत नोटीस जारी केलीय. विवेत तंखा आणि अंशुमन श्रीवास्तव यांनी न्यायालयासमोर मुनव्वरची बाजू मांडली.
प्रयागराजच्या ‘प्रोडक्शन वॉरंट’ला स्थगिती
मुनव्वरविरोधात एक याचिक प्रयागराजमध्येही दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात गेल्या महिन्यात प्रोडक्शन वॉरंट जारी करण्यात आलं होतं. प्रयागराज पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंट इंदूरच्या सीजेएम न्यायालय आणि तुरुंगासमोर सादर केलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं या प्रोडक्शन वॉरंटवर स्थगिती दिलीय.
अमित शहांबद्दल वादग्रस्त वक्तव्याचा आरोप
जवळपास महिन्याभरापूर्वी स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी यानं एका लाईव्ह शो दरम्यान हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप भाजपकडून आणि हिंदुत्ववादी संघटनेकडून करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी मुनव्वर फारुकीला अटक केली होती. इंदूरमध्ये मुनव्वर फारुकी यानं हिंदू देवी-देवता आणि केंद्रीय यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप स्थानिक भाजप आमदार मालिनी लक्ष्मणसिंह गौड यांचा मुलगा एकलव्य सिंह गौड यानं केला होता. मात्र, मुनव्वर फारुकी याच्याविरोधात कोणताही पुरावा आढळला नसल्याचं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times