पुणेः यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, खुद्द अजित पवार यांनीहीच या चर्चांवर स्पष्टीकरण देत नाना पटोलेंच्या राजीनाम्याबाबत भूमिकाही स्पष्ट केली आहे.

महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सत्तावाटप निश्चित केलं होतं. त्यात मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे, उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे तर, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे गेलं होतं. मात्र, काँग्रेस नेतृत्वानं पटोले यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवणार असल्याचा निर्णय घेतला असल्यानं पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, पटोले यांनी राजीनामा देतात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याचं बोललं जात होतं. यावर अजित पवारांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

वाचाः
पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काळजीवाहू अध्यक्ष म्हणून नरहरी झिरवाळ हे पदभार स्विकारणार आहेत. फक्त मला आणि मुख्यमंत्र्यांना एक वाटत होतं की अधिवेशन तोंडावर आहे. अधिवेशन संपल्यानंतर हे घडलं असतं तर अधिक बरं झालं असतं, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, ‘रात्री बातम्या पाहत असताना वेगळ्या चर्चेवरुन मुख्यमंत्री नाराज, उपमुख्यमंत्री नाराज असं ऐकल्यावर प्रश्न पडतो की नाराज होण्याचं कारण काय?, असा मिश्लिक सवाल त्यांनी केला.


वाचाः

‘जी काही पदं आहेत ती त्या पक्षांना ठरवल्याप्रमाणे दिली आहेत. ज्यावेळी यासंदर्भात ठरले तेव्हाच शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असं ठरलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच पाहिजे असं ठरलं होतं. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका स्विकारली,’ असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here