मुंबईः मनसे हा नेमका पक्ष आहे की संघटना हेच मला कळत नाही. ही टाइमपास टोळी, अशी टीका शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री यांनी केली होती. आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर मनसे आक्रमक झाली आता मनसेनं थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुंबई महापालिकेच्या कारभारावर मनसे नेते सातत्याने टीका करताना दिसतात. अलीकडेच मनसे नेते यांनी विरप्पन गँग असा उल्लेख केला होता. यावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताना. मनसे हा नेमका पक्ष आहे की संघटना हेच मला कळत नाही. ही टाइमपास टोळी आहे, असं वक्तव्य केलं होतं. आदित्य ठाकरेंच्या या विधानानंतर मनसे नेते आक्रमक झाले असून राज्यातील काही उदाहरणं देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणे व अनेक वर्षे तिथे स्मारक न करणं याला टाइमपास म्हणतात, असं म्हणत शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.

काय आहे नेमका वाद?

मनसेचे सरचिटणीस व माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर खंडणीखोरीचे आरोप केले होते. ही फेरीवाल्यांकडून रीतसर पावती देवून खंडणी वसूल करते, असं त्यांनी म्हटलं होतं. यावर उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी ‘मनसे हा नेमका पक्ष आहे की संघटना आहे हेच मला कळत नाही. ही ‘टाइमपास टोळी’ आहे असंच म्हणावं लागेल. ह्यांच्याकडं स्वत:चे कार्यकर्ते देखील लक्ष देत नाहीत. त्यामुळं आपणही लक्ष देण्याची गरज नाही,’ असं म्हटलं आहे

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here