बुलडाणा: जागतिक ठेवा असलेल्या सरोवर येथे आज मुख्यमंत्री यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विशेष म्हणजे, लोणार परिसराची पाहणी करताना उद्धव ठाकरे यांच्यातील छायाचित्रकार जागा झाला. त्यांनी स्वतः मोबाइल हाती घेऊन सरोवराचे नयनरम्य फोटो घेतले. (CM Clicks Photos of Lake)

आज सकाळी साडेनऊ वाजता मुख्यमंत्री ठाकरे औरंगाबादहून हेलिकॉप्टरने लोणार येथे आले. त्यांनी लोणार सरोवर परिसर, धारातीर्थ आणि इतर परिसराची स्वतः पाहणी केली. लोणारला भेट देणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले. पहिल्यांदाच मुख्यमंत्री येणार असल्यामुळं लोणारवासी व जिल्ह्यातही उत्सुकता होती. मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा लोणार शहरातून जात असताना त्यांनी नागरिकांचे अभिवादन देखील स्वीकारले.

वाचा:

पाहणी दौऱ्यात पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव, पंचायतराज समितीचे प्रमुख आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बळीराम मापारी, तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर हेही त्यांच्यासोबत होते. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर व वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही यावेळी उपस्थिती होती.

पालकमंत्र्यांना सेल्फीचा मोह

पाहणी सुरू असताना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना मोबाइल कॅमेरा अॅडजस्ट करून दिला. त्यानंतर शिंगणे यांनी सेल्फी घेतला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here