मुंबई: विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसनं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. पटोले यांच्या दिमतीला सहा कार्याध्यक्ष देण्यात आले आहेत. ( To Head Maharashtra Congress)

वाचा:

२०१९ च्या निवडणुकीपूर्वी यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली होती. निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि थोरात यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाले. विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यामुळं त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसमधून होत होती. गेले काही दिवस या पदासाठी अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा होती. पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव यांचेही नाव यात होते. अखेरच्या क्षणी अमित देशमुख यांचंही नाव पुढं आलं होतं. मात्र, नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावरच ही जबाबदारी येणार हे स्पष्ट झालं होतं. त्यावर आज शिक्कामोर्तब झालं.

यांच्यावर मोठी जबाबदारी

नव्या प्रदेश कार्यकारिणीत सहा जणांना कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आलं आहे. त्यात नव्या आणि जुन्या अशा नेत्यांचा समावेश आहे. सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे () यांचीही कार्यकारी अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. याशिवाय, शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, बसवराज पाटील, कुणाल पाटील व नसीम खान यांना कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजीत कांबळे, कैलाश गोरंट्याल, बी आय नगराळे, शरद आहेर, माणिकराव जगताप, एम. एम. शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here