वाचा:
राज्यपाल कोट्यातून नियुक्त करावयाच्या विधान परिषदेतील १२ जागा सध्या रिक्त आहेत. राज्य मंत्रिमंडळानं या नावांची शिफारस राज्यपालांना केली आहे. राज्यपालांनी नावांवर फुली मारू नये म्हणून बऱ्याच विचाराअंती सरकारनं ही नावं पाठवल्याचं समजतं. मात्र, नावांची शिफारस करून दोन महिने उलटल्यानंतरही राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. अजित पवार यांनी आज याबद्दल परखड मत व्यक्त केले. ते पत्रकारांशी बोलत होते.
वाचा:
‘राज्यपाल हे महत्त्वाच्या पदावर बसलेले आहेत. त्यांनी आता याबाबतीत अंत पाहू नये. लवकरात लवकर निर्णय घ्यावा,’ असं अजित पवार म्हणाले. ‘विधान परिषदेसाठी नावांची शिफारस करताना महाविकास आघाडी सरकानं सगळे नियम, अटी पाळल्या आहेत. मंत्रिमंडळात ठराव मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री महोदयाच्या सहीनं १२ नावांचं पत्र लिहिलं आहे. पूर्ण बहुमत आहे. सभागृहात १७१ आमदारांचं बहुमत सिद्ध झालंय. एवढं सगळं असतानाही ज्यांनी अंतिम निर्णय घ्यायचा, ते सही करत नाही, याबद्दल अजितदादांनी आश्चर्य व्यक्त केलं.
वाचा:
‘आता आम्हाला कधीतरी त्यांना भेटावं लागेल. किती वेळ थांबायचं हे विचारावं लागेल. नियुक्तीचा अधिकार त्यांचा असला तरी त्याला काही काळवेळ, मर्यादा आहेच ना,’ असंही ते म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times