वाचा:
पंजाबमधील फजलखां येथे जवानांसाठी असलेल्या निवासस्थानांमध्ये पाटील यांचा परिवार वास्तव्यास होता. तेथून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर भारत-पाकिस्तानच्या सीमेवर हे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव पंजाबहून मुंबई व मुंबईहून जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी आणले जाणार आहे. राहुल पाटील यांना वीरमरण आल्याची वार्ता गावात येताच एरंडोलसह संपूर्ण तालुक्यातच शोककळा पसरली आहे.
वाचा:
सकाळचे बोलणे ठरले अखेरचे…
राहुल पाटील यांनी आज सकाळी साडेसात वाजता व्हिडिओ कॉल करून एरंडोल येथील त्यांच्या भावाशी व आईशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी पुढच्या महिन्यात परिवारासह घरी येणार असल्याचे सांगितले होते. तसेच पाटील यांनी व्हिडिओ कॉलवर भाऊ व आईला कर्तव्य बजावत असलेले स्थळही दाखविले. एरंडोल येथील शंकरनगर गांधीपुरा परिसरात राहुल यांचे घर असून राहुल हे २००९ मध्ये लातूर येथे लष्करात भरती झाले होते. ते सीमा सुरक्षा दलात () सेवेत होते. पत्नी व त्यांच्या दोन मुलींसह ते पंजाबमध्येच राहत होते. शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एरंडोल त्यांच्या भावाला फोन वरून राहुल हे शहीद झाल्याची माहिती देण्यात आली.
वाचा:
दोन महिन्यात चौथा आघात
जळगाव जिल्ह्याने गेल्या दोन महिन्यांत चार सुपुत्र गमावले आहेत. २६ नोव्हेंबर रोजी श्रीनगर येथे दशहतवाद्यांनी लष्कराच्या शीघ्र कृती दलावर केलेल्या भ्याड हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील २१ वर्षीय जवान यांना वीरमरण आले होते. त्यानंतर जम्मूतील पुंच्छ मध्ये कर्तव्यावर असताना बर्फवृष्टीत जखमी झालेले चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील ३३ वर्षीय जवान अमित साहेबराव पाटील यांना १६ डिसेंबर रोजी वीरमरण आले होते. चाळीसगाव तालुक्यातीलच तांबोळे येथील २३ वर्षीय जवान मणिपूरमध्ये तैनात असताना झालेल्या गोळीबारात शहीद झाला होता. आता राहुल यांच्या रूपाने जिल्ह्यावर चौथा आघात झाला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times