मुंबईः राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांना करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. अनिल देशमुख यांनी स्वतः ट्विट करुन याबाबतची माहीती दिली आहे.

करोनाच्या काळातही अनिल देशमुख यांच्या कामाचा धडाका सुरु होता. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी केलेल्या कामाचं कौतुकही त्यांनी वेळोवेळी केलं होतं. तसंच, पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी ते राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलिस ठाण्यांना भेटही देत होते. त्याचबरोबर नागपूर, गडचिरोली अशा भागांचा दौराही त्यांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमातही त्यांची उपस्थिती असायचीय मात्र, करोनाच्या अनुषंगाने ते सर्व प्रकारची काळजीही घेत होते.

दरम्यानच्या काळात त्यांनी करोनाची चाचणी करुन घेतली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना तीव्र लक्षणे नसल्यानं ते घरीच क्वारंटाइन होणार असल्याचे समजते. ‘माझी करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करुन घ्यावी, असं मी आवाहन करतो. लवकरच मी करोनावर मात करुन पुन्हा आपल्यासाठी सेवेत हजर होईल,’ असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here