राज्यात रुग्णवाढीला गेल्या काही दिवसांपासून मोठा ब्रेक लागला आहे. करोनाबाधितांच्या तुलनेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळं रिकव्हरी रेट किंचित वाढला आहे. राज्यात आज ४० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण मृतांचा आकडा ५१ हजार २५५ इतके झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २. ५१ टक्के इतका आहे.
वाचाः
आज राज्यात २ हजार ६२८ नवीन करोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोना बाधितांचा आकडा २० लाख ३८ हजार ६३० इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४८ लाख ७५ हजार ६३३ चाचण्यांपैकी २० लाख ३८ हजार ६३० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
वाचाः
राज्यात करोना रिकव्हरी रेट वाढत असल्याने अॅक्टिव्ह रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. आजच्या आकडेवारीनुसार सध्या करोनाच्या ३३ हजार ९३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यात सर्वाधिक ठाण्यात ६ हजार ४९९, मुंबईत ५ हजार ७५० रुग्ण, पुणे जिल्ह्यात ५ हजार २२२ रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या राज्यात १ लाख ७७ हजार ५६० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २ हजार ०२५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times