भाईंदर: आणि विरोधी पक्षनेते यांनी राज्यात पुन्हा सत्तेत येण्याची आशा अद्याप सोडलेली नाही. सध्या महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्षपदावरून रस्सीखेच चालली असतानाच फडणवीस यांनी आज मिरा भाईंदरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना सत्तांतराबाबत खूप मोठे विधान केले आहे. ( )

वाचा:

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मिरा-भाईंदरमध्ये आज विविध कार्यक्रम झाले. मिरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलात टर्न टेबल लॅडर दाखल झाला असून त्याचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींचा थेट उल्लेख न करता महत्त्वाची विधानं केली. राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधी पक्षात बसावं लागल्याची सल त्यांच्या या बोलण्यात स्पष्टपणे दिसली.

वाचा:

राज्यात सर्वात कमी आमदार असलेला पक्ष सत्तेत आहे. सरकारला या पक्षाचा पाठिंबा आहे. त्याचवेळी भाजप हा सर्वात मोठा पक्ष असूनही या पक्षाला विरोधी पक्षात राहावं लागलं आहे. ही एकप्रकारे लोकशाहीची थट्टाच आहे. पण आम्ही निश्चितच फासे पलटवणार आहोत. शिडीशिवाय आम्ही फासे पलटवू आणि हे फासे खूप मोठे असतील, असे सांगत फडणवीस यांनी महाराष्ट्रात ”चे स्पष्ट संकेत दिले आहेत.

वाचा:

मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर फडणवीस यांनी जोरदार आक्षेप घेतला. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत बोलताना सर्वांनीच जपून बोललं पाहिजे, असे मत फडणवीस यांनी नोंदवले. यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. यासाठी पटोले यांना फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. काँग्रेसने कुणाला अध्यक्ष करावं आणि कुणाला करू नये ही त्यांची अंतर्गत बाब असून देशात आता काँग्रेस पक्ष उरलाच कुठे आहे, असा चिमटा पटोले यांनी काढला.

महाविकास आघाडीत रस्सीखेच

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर या पदासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. हे पद आता खुले झाले आहे, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पदासाठी नव्याने चर्चा करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे तर काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्षपदावर काँग्रेसचाच हक्क आहे, असे ठाम शब्दांत सांगितले आहे. दुसरीकडे शिवसेनेचाही या पदाव डोळा असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमध्ये भाजप आपली चाल खेळण्याची संधी शोधत आहे का?, अशी शक्यताही फडणवीस यांच्या विधानाने बळावली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here