मुंबई: शिवसेनेने भाजपला मुंबईत आणखी एक धक्का दिला आहे. नेते व माजी आमदार यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री यांनी हेगडे यांच्या हातावर शिवबंधन बांधत त्यांचे पक्षात स्वागत केले. विलेपार्ले मतदारसंघात हेगडे यांना मानणारा मोठा वर्ग असून आगामी महापालिका निवडणुकीत त्याचा शिवसेनेला फायदा मिळू शकतो. हे गणित डोक्यात ठेवूनच शिवसेनेने हेगडे यांच्यासाठी पक्षाची दारे खुली केल्याचे बोलले जात आहे. (BJP Leader )

वाचा:

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. २०२२ मध्ये पालिका निवडणुका होणार असल्या तरी देशातील आणि आशिया खंडातील या सर्वात मोठ्या महापालिकेवर सर्वच पक्षांचा आतापासूनच डोळा आहे. पालिकेत गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असून शिवसेनेला सत्तेतून दूर करण्यासाठी भाजपने ‘मेगा प्लान’ बनवला आहे. त्याला शह देण्यासाठीच व्यूहरचना आखत आहे. आधी गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’, अशी घोषणा दिल्यानंतर शिवसेनेने मुंबईत भाजपला एकामागून एक धक्के द्यायला सुरुवात केली आहे.

वाचा:

गेल्या आठवड्यात काँग्रेसचे नेते दिवंगत गुरुदास कामत यांचे भाचे व भाजपचे मुंबई सचिव यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. देसाई यांच्या प्रवेशाने शिवसेनेचा गोरेगावचा गड अधिक भक्कम झाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आता शिवसेनेने विलेपार्ले भागाकडे मोर्चा वळवत या भागात मोठा जनाधार असलेले नेते कृष्णा हेगडे यांना पक्षात प्रवेश दिला आहे. कृष्णा हेगडे हे काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचे समर्थक मानले जायचे. काँग्रेसच्या तिकिटावर ते विलेपार्ले मतदारसंघातून निवडून आले होते. संजय निरुपम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना निरुपम यांच्याशी झालेल्या मतभेदांतून हेगडे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेगडे यांना भाजपात प्रवेश दिला होता. मात्र, अलीकडच्या काळात ते नाराज होते. त्यातूनच त्यांनी नवे राजकीय पाऊल टाकत शिवसेनेची वाट चोखाळली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हेगडे यांच्या हातावर शिवबंधन बांधले तसेच भगवा झेंडा त्यांच्या हाती देत त्यांचे स्वागत केले. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. हेगडे यांना येत्या काळात पक्षात महत्त्वाचं पद दिलं जाण्याची शक्यता आहे. हेगडे यांच्यामुळे शिवसेनेला विलेपार्ले भागात आणखी बळ मिळणार आहे. अर्थातच आगामी पालिका निवडणुकीत त्याचा शिवसेनेला फायदा होणार आहे, असे बोलले जात आहे.

वाचा:

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा या महिलेने केलेल्या आरोपांनंतर कृष्णा हेगडे चर्चेत आले होते. या महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध तक्रार करून नंतर तक्रार मागे घेतली होती. या महिलेने आपल्यालाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा तेव्हा हेगडे यांनी केला होता. तशी तक्रारही त्यांनी पोलिसांकडे दिली होती.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here