कृषी कायदे ( ) तुमची जमीन हिसकावून घेतील, असं सांगून शेतकऱ्यांची फसवले गेले. कराराच्या शेती कायद्यातील कोणतीही एक तरतूद विरोधकांनी सांगावी जी हा दावा करते. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर कठोर भाष्य केलं.
यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि तो रोखण्यासाठी उपसभापतींना हस्तक्षेप करावा लागला. यानंतर त्यांनी कॉंग्रेससह खरगे यांच्यावर तीव्र हल्ला चढवला होता. शेती पाण्यावर केली जाते हे जगाला माहिती आहे. पण … त्यांच्या त्या वक्तव्याचा काही भाग संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आला आहे.
शेतकर्यांची जमीन हिसकावली जाईल, असं सांगून त्यांना भडकावलं जात आहे. यानंतर संसदेतही जोरदार गोंधळ उडाला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी टोकू नये, केंद्रीय मंत्री तोमर यांना बोलू द्या, असं आवाहन उपसभापतींनी केलं. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी उद्या ६ फेब्रुवारीला शेतकऱ्यांनी देशव्यापी चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times