वाचा:
मुख्यमंत्री ठाकरे यांनी लोणार येथील जगप्रसिद्ध सरोवराची पाहणी करून या परिसराचे जतन, संवर्धन व विकासाबाबत आढावा बैठकही घेतली. यावेळी त्यांचे समवेत पालकमंत्री डॉ. , जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर, संजय गायकवाड, राजेश एकडे आदी उपस्थित होते. यावेळी संवर्धन विकासकामांबाबत जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी सादरीकरण केले. यात प्राधान्याने करावयाच्या कामांची माहिती देण्यात आली. तसेच सुलतानपूर येथील कौशल्य विकास केंद्र व अंजनी खुर्द येथील आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.
वाचा:
बैठकीस संबोधन करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, लोणार परिसर आणि यासारखी अनेक स्थळे ही महाराष्ट्राचे वैभव आहेत. हा लपलेला खजिना आहे. हा आपल्याला जगासमोर आणायचा आहे. लोणार सरोवर परिसराचे जतन संवर्धन करताना निश्चित प्राधान्यक्रम ठरवून कामे केली जातील. यात जे जे नैसर्गिकरित्या प्राप्त झालं आहे ते जतन करणे ह्याला प्राथमिकता असेल. इथं येणाऱ्या पर्यटकांसाठी सोयी सुविधा निर्माण करणे. सांडपाण्याची पर्यायी व्यवस्था करणे, प्रक्रिया करणे ह्या सर्व बाबी विकास आराखड्यात आहेत. ह्या विकास आराखड्याला निधी कमी पडू देणार नाही. तसेच प्राचिन मंदिरांचेही जतन संवर्धन केले जाईल. याचाच एक भाग म्हणून लोणार महोत्सव आयोजित करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
वाचा:
हा विकास करताना स्थानिक गावकऱ्यांचा सहभाग घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर ते समाजावून घेऊन सोडवणूक करू आणि सर्व मिळून ह्या परिसराचा विकास करू, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, याच धर्तीवर मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील विकास करावयाचा आहे. त्यासाठी नियोजित आराखड्यावर मुंबईत बैठका होतील. या विकासाबाबत प्रश्न समजावून घेऊन त्यावरचे उपाय निश्चित करून मग प्रत्यक्ष सिंदखेडराजाला भेट देण्यासाठी आपण येऊ, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, ठरल्याप्रमाणे आराखडा नक्की झाल्यावर होणारे काम हे वेगात आणि पक्के व्हायला हवे. हे वैभव जपण्याची व त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपणा साऱ्यांची आहे. लोणारच्या विकासासाठी मी थेट मुख्यमंत्री कार्यालयातून नियंत्रण ठेवेन, दर महिना, पंधरा दिवसाला प्रगतीचा आढावा घेईल, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री रमले आठवणींत
लोणार बाबत बोलताना, ‘मुख्यमंत्र्यांनी हा विषय फार पूर्वीपासून मनात होता’, असे सांगितले. आठवण सांगताना ते म्हणाले की, ‘बऱ्याच वर्षांपूर्वी मी लोणार येथे आलो होतो. येथील मी काढलेले छायाचित्र माझ्या छायाचित्र प्रदर्शनात लावले होते. प्रदर्शन पहायला येणारे लोक लोणारच्या छायाचित्रापाशी थबकत. ते याबद्दल कुतुहलाने चौकशी करत. इथं यायचं कसं? थांबायचं कुठं, अशी माहिती विचारत. त्या वेळपासूनच ह्या भागाचा विकास पर्यटनाच्या दृष्टीने झाला पाहिजे, हे मनात होतं. म्हणूनच मी आज इथं आलो,असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times