ही घटना आरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत १ जानेवारी २०२० ते १ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान घडली. शुभम छोटु कटरे (वय २४, रा. मौदा) असे याप्रकरणातील आरोपीचे नाव आहे. त्याची आणि याप्रकरणातील १७ वर्षीय पीडित मुलीची ओळख होती. त्याने तिच्यावर अनेकदा अत्याचार केल्याचा आरोप या अल्पवयीन मुलीने केला आहे. यातून तिला गर्भधारणा झाली. ती ३ महिन्यांची गर्भवती असल्याचे शुभमला समजले. आपले बिंग फुटणार हे लक्षात येताच त्याने तिचा गर्भपात करण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने तिला एक औषध आणून दिले. या औषधांमुळे या मुलीची प्रकृती अचानक ढासाळली. अखेर हा प्रकारच्या या मुलीच्या कुटुंबीयांपुढे आला. तिची प्रकृती लक्षात घेता तिचा गर्भपात करणे अत्यावश्यक झाले होते. अखेर तिच्या संमतीने भंडारा येथील सामान्य रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आला. या मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर अरोली पोलिसांनी शुभमवर भादंविच्या आणि बालकांचे लैंगिक आजारापासून संरक्षण कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times