मुंबई: प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर मावळते प्रदेशाध्यक्ष यांनी पटोले व नव्या टीमचे अभिनंदन केले आहे. थोरात यांनी गेल्या दीड वर्षातील आपल्या कारकीर्दीत आलेल्या आव्हानांचा धावता उल्लेख करतानाच हायकमांडचेही आभार मानलेत. ( Balasaheb Thorat On Update )

वाचा:

विधानसभा निवडणुकीआधी बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसची धुरा देण्यात आली होती. काँग्रेससाठी तेव्हाची स्थिती फारच आव्हानात्मक होती. पक्षातही बरीच मरगळ आलेली होती. त्या स्थितीतही थोरात यांनी सर्वांना सोबत घेऊन चांगले नेतृत्व दिले. त्याचा परिणाम म्हणून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले. विशेष म्हणजे सत्तेच्या फ्रेममध्ये काँग्रेस पक्ष कुणालाच दिसत नव्हता. असे असताना राजकीय उलथापालथ होऊन आज काँग्रेस राज्यातील सत्तेत तिसरा वाटेकरी आहे. म्हणूनच थोरात यांचे नेतृत्व ठसा उमटवणारे ठरले. आता या जबाबदारीतून मुक्त होत असताना निष्ठावंत थोरात यांनी नव्या टीमला पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काही ठळक सूचना केल्या आहेत.

वाचा:

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल नाना पटोले यांचे यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्यासोबतच शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आरिफ नसीम खान, कुणाल पाटील, प्रणिती शिंदे या नवनियुक्त कार्याध्यक्ष तसेच उपाध्यक्षांनाही मी शुभेच्छा देतो, असे नमूद करत थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘काँग्रेसचा विचार हा शाश्वत आहे. पददलित आणि सामान्य माणसाच्या उन्नतीचा आणि उत्थानाचा विचार हा काँग्रेसचा गाभा आहे. आजवर आम्ही प्रामाणिकपणे हा विचार जपला आणि वाढवला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. पक्षश्रेष्ठी , यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. अनंत अडचणी असतानाही महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते भक्कमपणे माझ्या सोबत उभे राहिले. आम्ही धर्मांध जातीयवादी शक्तींविरोधात एकजुटीने आणि निकराने लढाई लढलो. महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने नव्या व्यक्तीकडे द्यावी, ही अपेक्षा मी सातत्याने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे व्यक्त करत होतो, काँग्रेसचे कार्य अधिक चांगले व्हावे ही माझी अपेक्षा आहे. आता तो निर्णय झाला आहे, गेल्या दीड वर्षात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला विलक्षण प्रेम दिले. रात्रीचा दिवस करून अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोलाची साथ दिली त्या सर्वांचे मी आभार मानतो’, असे थोरात म्हणाले. राज्यातील पक्ष संघटनेचे नवे शिलेदार काँग्रेसचा विचार आणि संघटन बळकट करण्यासाठी पूर्ण वेळ आणि गतीने कार्यरत राहतील. सरकार आणि संघटना दोन्ही पातळीवर काँग्रेस जनतेचा आवाज बनून काम करेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे, असेही थोरात यांनी पुढे नमूद केले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here