कोल्हापूर: ग्राहकांनी भरण्याकडे पाठ फिरवल्याने प्रचंड आर्थिक संकटात सापडलेल्या कंपनीने आता वसुलीसाठी कारवाईचा बडगा उगारला आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील ७५ लाख थकबाकीदारांना वीज कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. यामुळे राज्यात खळबळ उडाली असून याविरोधात भाजपने आंदोलन सुरू केले आहे. ( )

वाचा:

काळातील वीजबिल माफ करा, अन्यथा बिल भरणार नाही अशी भूमिका राज्यातील हजारो ग्राहकांनी घेतली आहे. यामुळे गेले सहा महिने बिल भरण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्रातच ४७ लाख ३० हजार ९०० वीजग्राहकांकडे तब्बल २३५९ कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आकडा चारशे कोटीपर्यंत तर सांगली जिल्ह्याचा आकडा तीनशे कोटीपेक्षा अधिक झाला आहे. गेल्या ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत तीन महिन्यात पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व सार्वजनिक सेवा वर्गवारीतील थकबाकीदारांच्या संख्येत तब्बल १४ लाख ९० हजार ग्राहकांची भर पडली आहे. थकबाकी देखील ६९३ कोटीनी वाढली आहे. सद्यस्थितीत पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यामध्ये वीजग्राहकांकडे २३५९ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

वाचा:

वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी व पुरवठा यामध्ये वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ, देखभाल व दुरुस्ती व इतर खर्च भागविण्यासाठी व अन्य देणी देण्यासाठी महावितरणकडे पैसे नाहीत. यामुळे महावितरणने वसुलीसाठी आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून थकबाकीदारांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसात थकबाकी न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याबरोबरच बिल भरल्यानंतर पुन्हा कनेक्शन जोडण्याचा खर्चही ग्राहकांकडून वसूल करण्यात येणार आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात ७५ लाख ग्राहकांना या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

वाचा:

महावितरणच्या या कारवाईच्या विरोधात भाजपने शुक्रवारी राज्यभर महावितरण कार्यालयास टाळे ठोको आंदोलन केले. कोल्हापुरात झालेल्या आंदोलनात पोलीस व कार्यकर्ते यांच्यात मोठी झटापट झाली. यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. महावितरणचे कर्मचारी नागरिकांच्या घरातील वीज कनेक्शन तोडण्यास गेले तर त्याला विरोध करण्यात येईल. याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष यांनी दिला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here