हिंसाचार घडवण्याचा कटः टिकैत
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार नाही. कारण या ठिकाणी काही लोक हिंसाचार घडवण्याचा प्रयत्नात होते. आणि आमच्याकडे याचे पुरावे आहेत, असं भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले.
मार्गदर्शक सूचनांनुसार देशभरातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर दुपारी १२ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चक्का जाम केला जाईल. पण आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा यासारख्या रुग्णवाहिका, स्कूल बस या रोखल्या जाणार नाहीत. चक्का जाम पूर्णपणे शांत आणि अहिंसक राहील. या आंदोलना वेळी कोणताही अधिकारी, कर्मचारी किंवा सामान्य नागरिकाशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये, अशी सूचना आंदोलकांना देण्यात आली आहे. दिल्ली सीमेच्या आत चक्का जामचे कोणतेही आंदोलन होणार नाही कारण सर्व आंदोलनाच्या ठिकाणी आधीपासूनच ‘चक्का जाम ‘ आहे. दिल्लीत प्रवेश करणारे सर्व रस्ते मोकळे असतील. पण शेतकऱ्यांनी आडवलेले रस्ते सोडून. चक्क जाम आंदोलन दुपारी ३ वाजता हॉर्न वाजवून शेतकर्यांच्या ऐक्यातून संपवला जाईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
संयुक्त किसान मोर्चाने जनतेला या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे. ‘अन्नदात्या’ला आपला पाठिंबा देऊ एकजूटता व्यक्त करावी, असं संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times