म. टा. प्रतिनिधी,
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष यांनी शुक्रवारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर अधिक आक्रमक भूमिका घेण्याचे आदेश दिले. भारतीय जनता पक्षासोबत एकत्र जाण्याबाबत सध्या तरी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका असल्याचेही संकेत त्यांनी यावेळी दिले. ( on Pune Municipal Elections)

पुणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीला वर्षभराचा कालावधी राहिला आहे. या पार्श्वभूमीवर ‘मनसे’च्या कोअर कमिटीने गेल्या तीन बैठकांमध्ये स्थानिक स्तरावरील पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्याकडून घेतलेल्या निरीक्षणांबाबतची माहिती ठाकरे यांना देण्यात आली. पक्ष संघटन आणि आगामी महापालिका निवडणुकांबाबतही शुक्रवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा ठाकरे यांनी घेतला. या वेळी त्यांनी शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती जाणून घेतली. शहराचा पाणीपुरवठा, अॅमेनिटी स्पेस, सहा मीटर-नऊ मीटर रस्ते अशा महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पक्षाने घेतलेली भूमिका-आंदोलने यांची माहिती पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांना दिली. या वेळी नागरिकांशी संबंधित सर्वच महत्त्वाच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवा, असेही ठाकरे यांनी सूचित केले.

वाचा:

राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष महाविकास आघाडीत एकत्र आल्याने मनसे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. याबाबत, पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी सध्या तरी भाजपसोबत युती करू नये, अशी विनंती ठाकरे यांना केली. त्याबाबत, आगामी काळात निर्णय घेण्यात येईल असे सांगत सध्या तरी भाजपबाबत ‘वेट अँड वॉच’चे धोरण असल्याचे सुतोवाच ठाकरे यांनी केले.

राजदूत पोहोचणार मतदारांपर्यंत

महापालिका निवडणुकीत अखेरच्या मतदारापर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे मतदारसंघातील भागनिहाय यादीवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने गटाध्यक्षांचे नामकरण ‘राजदूत’ असे करून त्यांच्याकडून स्थानिक स्तरावर कशा स्वरूपात काम केले जाणे अपेक्षित आहे, याबाबत ठाकरे सर्वांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, मनसेची भूमिका जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘राजदूत’ अधिक कार्यक्षम करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here