मुंबई: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर मोर्चानंतर देशभरातील शेतकरी संघटनांनी आज ‘चक्का जाम’ आंदोलन पुकारलं आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी या ‘चक्काजाम’ला पाठिंबा दिला आहे. त्यावरून भाजपनं शिवसेनेवर टीकेची तोफ डागलीय. (BJP Leader Slams Shiv Sena For Supporting )

भाजपचे नेते व माजी मंत्री यांनी शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांत टीका केलीय. ‘काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा “चक्काजाम” झालाय का? सत्तेसाठी महाराष्ट्र धर्मावर “ट्रॅक्टर” फिरवणार का?,’ असा सवाल शेलार यांनी केला आहे.

वाचा:

शेतकरी आंदोलनावरून सध्या सेलिब्रिटीही व्यक्त होऊ लागले आहेत. अमेरिकी पॉपस्टार रिहाना व पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी ट्वीटच्या माध्यमातून भारतातील शेतकरी आंदोलनाबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर माजी क्रिकेटपटू याच्यासह भारतीय सेलिब्रिटींनी त्यांना उत्तर दिलं. त्यावरून शिवसेनेनं भारतातील सेलिब्रिटींच्या सोयीस्कर भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. रिहाना, थनबर्गच्या ट्वीटला उत्तर देणाऱ्या सेलिब्रिटींना भाजपनं लक्झरी गाडीत बसवून गाझीपूर, सिंघू बॉर्डरला नेलं पाहिजे, असं खासदार संजय राऊत यांनी सुनावलं होतं. शेलार यांनी याच मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

वाचा:

‘देशांतर्गत विषयात उगाच ढवळाढवळ करणाऱ्या रिहाना, ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा या परदेशींच्या तालावर काँग्रेस-शिवसेना ‘पॉप डान्स’ करतेय. या परदेशींना सचिन तेंडुलकर, लतादीदींनी खडसावले, अण्णा हजारेंनी लोकशाहीचा सन्मान केला तर त्यांच्या विरोधात हेच धिंगाणा घालतात, असं सांगतानाच, ‘वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा सन्मान केला त्या भारतरत्न, महाराष्ट्र भूषण व्यक्तींवर शिंतोडे उडवून महाराष्ट्र द्रोह का करतेय?,’ असा सवालही शेलार यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here