मुंबई: दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. सचिन तेंडुलकरसह काही सेलिब्रिटींवर सत्ताधारी नेत्यांनी टीका केल्यामुळं भाजपनं त्यांच्यावर टीका केली आहे. तर, भाजपला उत्तर देताना काँग्रेसनं मुंबई, महाराष्ट्राच्या अपमानाचा मुद्दा पुढं आणला आहे.

वाचा:

कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर ७० हून जास्त दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. राजकीय नेत्यांमध्ये आंदोलनावरून कलगीतुरा सुरू होता. मात्र, देशातील मान्यवर सेलिब्रिटींनी यावर भूमिका मांडणं टाळलं होतं. अमेरिकी पॉपस्टार रिहाना आणि पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी आंदोलनाबद्दल सहानुभूती व्यक्त केल्यानंतर मात्र भारतीय सेलिब्रिटी व्यक्त झाले. भारताच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ न करण्याचा सल्ला सचिन तेंडुलकरसह अनेकांनी रिहाना आणि ग्रेटाला दिला. आंदोलनाबद्दल चकार शब्द न काढणाऱ्या भारतातील सेलिब्रिटींनी ग्रेटा व रिहानाच्या ट्वीटला प्रत्युत्तर दिल्यानं ते देशातील राजकीय पक्षांच्या टीकेच्या रडारवर आले.

वाचा:

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सचिनसह इतर सेलिब्रिटींना टोमणे मारले. केरळमध्ये सचिनच्या पोस्टरला काळ्या तेलाची आंघोळ घालून त्याचा निषेध करण्यात आला. त्यावरून व भाजपच्या अन्य नेत्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

वाचा:

‘देशात अन्नदात्याचा सन्मान सर्वतोपरी आहे. या अन्नदात्याला खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही म्हणणाऱ्या भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांची साथ दिली, असा आरोप करतनाच, ‘मुंबई पोलिसांना माफिया, मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?,’ असा रोकडा सवाल सावंत यांनी भाजप नेत्यांना केला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here