वाचा:
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता या पदासाठी पुन्हा एकदा निवडणूक होणार आहे. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी ‘ऑपरेशन लोटस’चे संकेत दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानावर शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तिरकस टिप्पणी केली आहे. ‘ते स्वप्न बघत आहेत. त्यांना चार वर्षे स्वप्न बघत रहावे लागेल. सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे असे अंदाज व्यक्त करण्याखेरीज आता तरी त्यांच्या हातात काही नाही. आमचे महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे सरकार स्थिर झालेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेने वाढता विश्वास दाखविला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांची आपली मुदत पूर्ण करेल,’ असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे कोणतीही नाराजी नाही. परंतु, पटोले विधानसभा अध्यक्ष म्हणून अधिक काळ लाभले असते तर बरे झाले असते. ते आम्हाला हवे होते. परंतु, त्यांचा पक्षांतर्गत विचार असल्यामुळे दुसऱ्या पदावर जाण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला. आमच्या नाना पटोले यांना खूप खूप शुभेच्छा. कुठल्याही पदावर गेले तरी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असेही देसाई म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times