सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या पहिल्या पदवी प्रदान समारंभात निम्म्यापेक्षा अधिक व्यक्तींना मराठी भाषा समजत असतांनाही, मराठी भाषा मंत्री यांनी भाषण इंग्रजीत केल्यामुळे, उपस्थितांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे.
एकीकडे राज्यपाल, मुख्यमंत्री जाहीर कार्यक्रमात उपस्थितांना मराठी बोलण्याचा आग्रह धरतात, तर दुसरीकडे मराठी भाषा विभागाचे मंत्री इंग्रजीत भाषण करतात, अशी चर्चा समारंभात होती. देसाई यांनी भाषणाला सुरुवात मराठीतून केली. त्यावेळी सर्व उपस्थितांनी दाद दिली. मात्र, नंतर देसाई यांनी इंग्रजीतून भाषण केल्यामुळे, उपस्थितांमध्ये कुजबुज सुरू झाली. मराठी भाषा विभागाचे मंत्रीच मराठीत भाषण करीत नाही, तर मराठी भाषेचा प्रसार-प्रचार कसा होईल, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times