ममतादीदीने पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेपासून वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय केला, असा आरोप नड्डा यांनी केला. आपला अहंकार जपण्यासाठी ममतांनी ही कल्याणकारी योजना लागू होऊ दिली नाही. आता बंगालच्या शेतकऱ्यांमधून ही योजना लागू करण्याची मागणी होऊ लागली, तेव्हा ममता बॅनर्जींनी ती लागू करणार असल्याची घोषणा केली. ७० लाख शेतकरी दोन वर्षांसाठी वार्षिक सहा हजार रुपयांपासून वंचित आहेत, असा आरोप नड्डांनी केला.
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मालदामधील शाहपूर गावात ‘शेतकरी सुरक्षा सह-भोज’मध्ये शेतकऱ्यांसोबत जेवण देखील केलं. त्यांनी खिचडी आणि भाजी देण्यात आली. कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये २३ जानेवारीला घडलेल्या घटनेकडे त्यांनी लक्ष वेधलं. आपण आलो त्यावेळी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या. पण या घोषणा ऐकून ममता बॅनर्जी का संतापल्या हे कळत नाही?, असं नड्डा म्हणाले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कोलकातामधील व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये २३ जानेवारीला आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘जय श्रीराम’ च्या घोषणा दिल्या गेल्या. यानंतर ममता बॅनर्जींनी भाषण करण्यास नकार दिला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times