ब्रिटीश अभिनेत्री जमीला सोशल मीडियावर खुप सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ३ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. जमीला एक मॉडेल आणि अभिनेत्री असण्यासोबत रेडिओ जॉकी, लेखिका अॅक्टिविस्ट आणि बॉडी पॉझिटीव्ह अॅडवोकेट सुद्धा आहे. जमीलानं नुकतीच तिच्या इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहून स्वतःसोबत घडलेली घटना कथन केली आहे.
जमीलानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘मागच्या काही महिन्यांपासून भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत मी सोशल मीडियावर काही पोस्ट लिहिल्या होत्या. ज्यात मी शेतकऱ्यांना समर्थन दिलं होतं. मी तिथं घडत असलेल्या घटनांविषयी बोलायला सुरुवात केल्यानंतर मला सोशल मीडियावरून बलात्कार आणि हत्येच्या धमक्या दिल्या जात आहेत.’
या पोस्टमध्ये जमीला पुढे लिहिते, ‘माझ्यावर अशाप्रकारे दबाव टाकण्याआधी या गोष्टी लक्षात घ्या की, मी एक माणूस आहे आणि माझ्या सहनशक्तीच्या काही मर्यादा आहेत. जे करत आहेत. त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. कारण ते आपल्या हक्कांसाठी लढत आहेत. मला वाटतं की, जेव्हा महिला आणि पुरुष अशा विषयांवर भाष्य करतात तेव्हा पुरुषांना स्त्रियांच्या तुलनेत अशा प्रकारच्या समस्यांना कमी प्रमाणात सामोरं जावं लागतं.’
जमीलाबद्दल बोलायचं तर ती लोकप्रिय कॉमेडी शो ‘द गुड प्लेस’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. या सीरिजमध्ये तिनं तहानी अल जमील ही भूमिका साकारली होती. याशिवाय तिनं ‘द मिसरी गेम’ हा शो होस्ट केला होता. तसेच एका रिअलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून सुद्धा ती दिसली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times