मुंबई: राज्यात आज २५ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात २ हजार ७६८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर १ हजार ७३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील ९५.७२ टक्के इतका झाला असून मृत्यूदरही कमी होत असल्याने तो खूप मोठा दिलासा ठरला आहे. ( )

वाचा:

राज्यात गेल्या ११ महिन्यांपासून करोना साथीने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनावर खूप मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. नवीन बाधितांच्या संख्येत चढउतार होत असला तरी मृत्यूचे प्रमाण वेगाने कमी होत असल्याने ती सर्वात महत्त्वाची बाब ठरली आहे. आरोग्य विभागाने आजची आकडेवारी जारी केली असून आज २५ करोना बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या काही महिन्यांतील हा नीचांकी आकडा ठरला आहे. राज्यात करोनाने आतापर्यंत ५१ हजार २८० रुग्ण दगावले असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५१ टक्के एवढा आहे.

वाचा:

आज २ हजार ७६८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्याचवेळी १७३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नवीन बाधितांच्या तुलनेत हा आकडा कमी असल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ५३ हजार ९२६ करोना बाधित रुग्ण करोनामुक्त झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.७२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४९ लाख २८ हजार १३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ४१ हजार ३९८ ( १३.६७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ७३ हजार ५०४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर १ हजार ९८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

पुण्यातील रुग्णसंख्येत मोठी घट

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या ३४ हजार ९३४ इतकी आहे. त्यात जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा वेगाने खाली येताना दिसत आहे. पुण्यात सातत्याने सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आढळून येत होते. मात्र, सध्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५ हजार ५२२ इतकी खाली आली आहे. सध्या सर्वाधिक ६ हजार ५११ अॅक्टिव्ह रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यापाठोपाठ पालिका हद्दीत ५ हजार ७११ रुग्ण आहेत. तिसऱ्या स्थानी पुणे आहे. पुण्यासाठी हा खूप मोठा दिलासा आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here