पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश
लसीकरणाच्या बाबतीत यूपी पहिल्या स्थानावर आहे तर महाराष्ट्र दुसर्या क्रमांकावर तर राजस्थान तिसर्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात ४,३४,९४३ , राजस्थानमध्ये ४,१४,४२२ आणि कर्नाटकमध्ये ३,६०,५९२ जणांना लस देण्यात आली आहे, असं वृत्त पीटीआयने दिलं आहे. गेल्या २४ तासांत १०,५०२ केंद्रांमध्ये लसीकरण घेण्यात आलं. यामध्ये एकूण ४,५७,४०४ जणांना करोनावरील लसचा पहिला डोस दिला गेला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
मार्चपासून ५० वर्षांवरील वयाच्या नागरिकांना लस
आतापर्यंत देशात लसीकरणासाठी १,०६,३०३ सत्रे घेण्यात आली आहेत. गेल्या २४ तासांत लस घेतलेल्यांमध्ये ३,०१,५३७ आरोग्य कर्मचारी आहेत तर १,५५,८६७ कर्मचारी आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लोकसभेत शुक्रवारी लसीकरणाबाबत माहिती दिली. ५० वर्षांवरील वयाच्या नागरिकांना लस देण्याची प्रक्रिया मार्चच्या दुसर्या किंवा तिसर्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते, असं हर्षवर्धन म्हणाले.
कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर ४८० कोटींचा खर्च
सरकारने पहिल्या टप्प्यात एक कोटी आरोग्य कर्मचार्यांना लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. २ फेब्रुवारीपासून आघाडीवरील कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. आघाडीवर काम करणाऱ्या दोन कोटी कर्मचाऱ्यांना लस देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. एकूण तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी सुमारे ४८० कोटी रुपये खर्च केले जातील, असं केंद्र सरकारने लोकसभेत सांगितलं.
१३ फेब्रुवारीपासून दुसरा डोस
लसीकरणानंतर केवळ २७ जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. लसीमुळे गंभीर, अत्यंत गंभीर किंवा मृत्यूची कोणतीही घटना नोंदलेली नाही. डोस घेणारे ६१ टक्के कर्मचारी हे आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अगनानी यांनी सांगितलं. तर आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस हा १३ फेब्रुवारीपासून दिला जाईल, असं निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times