मुंबई: मनसे अध्यक्ष आज बऱ्याच दिवसांनंतर माध्यमांना सामोरे गेले आणि त्यांनी अनेक विषयांवर चौफेर फटकेबाजी केली. भारतरत्न , आणि अन्य काही सेलिब्रिटींनी ट्वीटरवर व्यक्त केलेली मते सध्या चर्चेत आहेत. त्यावर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केले. ( Latest News Updates )

वाचा:

राज ठाकरे यांनी सचिन, लतादीदी तसेच सेलिब्रिटींना दोष न देता यासाठी केंद्रातील सरकारला दोषी ठरवले. सरकारला त्यांनी खरमरीत शब्दांत सल्लाही दिला. ‘आपल्या एखाद्या धोरणासाठी भारत सरकारने भारतरत्नांची प्रतिष्ठा पणाला लावू नये. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही माणसं दिग्गज आहेत पण साधी आहेत. आपल्या भारत सरकारने सांगितलं म्हणून त्यांनी ट्वीट केलं पण आज सर्व रोषाला त्यांनाच सामोरं जावं लागतंय. सरकारने अशी घोडचूक पुन्हा करू नये’, अशा शब्दांत राज यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला. एखादं देशांतर्गत आंदोलन चिघळलं म्हणून आपली बाजू सावरून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी भारतरत्नांना ट्वीट करायला सांगणं चुकीचंच आहे, असेही राज पुढे म्हणाले.

वाचा:

पॉपस्टार रिहानाच्या एका ट्वीटने या संपूर्ण वादाची सुरुवात झाली आहे. त्यावरूनही राज यांनी निशाणा साधला. ‘रिहानाने एक ट्वीट केलं तर सर्व आगपाखड करतायत आणि म्हणतायत की आमच्या देशाचा प्रश्न तू नाक खुपसू नको मग ‘अगली बार ट्रम्प सरकार’ म्हणत जाऊन भाषणंही करायची गरज नव्हती, तोही त्यांच्या देशाचा प्रश्न होता, असा सणसणीत टोला राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावला.

दरम्यान, ज्येष्ठ नेते यांनीही, आपले क्षेत्र सोडून इतर क्षेत्राबद्दल विधान करताना काळजी घ्या, असा सल्ला सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांना दिला आहे.

वाचा:

राज म्हणाले…

>> पुण्यात शर्जील उस्मानीला तिथेच चोपायला पाहिजे होतं. पण मला प्रश्न पडतो की, त्याला कुणी हे बोलायला लावलंय का? कारण सध्या राज्यात अशाच पद्धतीचं राजकारण सुरु आहे. कुणाला तरी बोलायला लावायचं आणि त्यावर मग राजकारण करायचं.

>> भाजप आणि शिवसेनेची ज्यावेळेस केंद्रात-राज्यात सत्ता होती तेव्हा देशातल्या अनेक शहरांची, दिल्लीतल्या रस्त्यांची नावं बदलली गेली. पण औरंगाबादचं संभाजीनगर का नाही झालं? ह्याचं उत्तर भाजप-शिवसेनेने द्यावं. तिथले नागरिक हे सर्व पाहत आहेत ह्यांचा योग्य तो समाचार ते घेतील.

>> लोकांसाठी नाही तर एकमेकांना शह-काटशह देण्यासाठी राज्यात सध्या इतर राजकीय पक्षांची आंदोलनं सुरु आहेत. भाजपने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यापेक्षा केंद्राशी बोलावं ना? तुमचंच सरकार आहे ना!

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here