चेन्नई, : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक अजब गोष्ट पाहायला मिळाली. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने यावेळी फिरकीपटू कुलदीप यादवचा गळा पकडल्याचे यावेळी पाहायला मिळाले. तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसत नसेल, पण या गोष्टीचा व्हिडीओ सध्या क्रिकेट जगतामध्ये चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

नेमकं घडलं तरी काय, पाहा…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस होता. दुसऱ्याचा दिवसाचा खेळ संपला तेव्हा सर्व खेळाडू पेव्हेलियनमध्ये परतण्याच्या तयारीत होते. त्यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही तिथेच उभे होते. भारतीय खेळाडू पेव्हेलियनमध्ये जात असताना मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव तिथेच उभे होते. भारताचा एक खेळाडू आतमध्ये गेल्यावर सिराजने कुलदीपचा गळा धरल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या गोष्टीवरुन आता काही चाहते राजकारणही करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड मजबूत स्थितीत पोहोचला आहे. दुसऱ्या दिवशी कर्णधार जो रूटने झळकावलेल्या ऐतिहासिक द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडने दिवसा अखेर ८ बाद ५५५ धावा केल्या. पहिल्या दिवसाप्रमाणेच भारतीय गोलंदाजांना विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. इंग्लंडने दुसऱ्या दिवशी कालच्या ३ बाद २६३ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. कर्णधार रूट आणि बेन स्टोक्स यांनी चौथ्या विकेटसाठी १२४ धावांची भागिदारी केली. स्टोक्सने ११८ चेंडूत ८२ धावा केल्या. त्याला अश्विनने बाद केले. त्यानंतर ओली पोपला त्यानेच ३४वर माघारी पाठवले. दरम्यान कर्णधार रुटने कसोटी करिअरमधील पाचवे द्विशतक झळकावले.

जो रुटला यावेळी २१८ धावांवर असताना नदीमने बाद केले आणि भारताला मोठी विकेट मिळून दिली. त्यानंतर इशांत शर्माने सलग दोन चेंडूवर जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर यांना बाद करत इंग्लंडला दोन धक्के दिले. इशांतला हॅटट्रिकची संधी होती. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज प्रभाव टाकू शकले नाही. त्यात गचाळ क्षेत्ररक्षण यामुळे भारतीय खेळाडूंनी इंग्लंडच्या खेळाडूंना बाद करण्याच्या संधीही यावेळी गमावल्याचे पाहायला मिळाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here