मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतामधील दिग्गज व्यक्तींचे ट्विट चांगलेच वादग्रस्त ठरत आहे. सचिन तेंडुलकरने शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केलेले ट्विट चांगलेच वादग्रस्त ठरले होते. त्यानंतर आता बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे एक ट्विट वादग्रस्त ठरत आहे. इंग्लंडच्या एका माजी क्रिकेटपटूने बच्चन यांच्यावर सणकून टीका केल्याचेही यावेळी पाहायला मिळत आहे.

नेमकं घडलंय तरी काय, पाहा…या गोष्टीला सुरुवात झाली होती ती २०१६ साली. जेव्हा ट्वेन्टी-२० विश्वचषक सुरु होता. त्यावेळी इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँण्ड्रयू फ्लिंटॉफने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये फ्लिंटॉफने म्हटले होते की, ” भारताचा कर्णधार विराट कोहली जर याच गतीने खेळत राहीला तर तो एकदिवस नक्कच जो रुटची बरोबरी करु शकतो.”

त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी काय उत्तर दिले होते, पाहा…फ्लिंटॉफचे हे ट्विट बच्चन यांनी पाहिले होते. बच्चन हे भारतीय क्रिकेटबाबत नेहमीच ट्विट करत आहे. यावेळी फ्लिंटॉफला उत्तर देताना बच्चन म्हणाले की, ” कोण आहे हा रुट, या रुटला मुळापासून उखडून टाकू…” अमिताभ यांनी यावेळी फ्लिंटॉफला त्याचाच भाषेत चोख उत्तर दिले होते. पण त्यावर फ्लिंटॉफ थांबलेला दिसत नाही. हे ट्विट फ्लिंटॉफला आज पुन्हा आठवले आणि त्याने यावेळी बच्चन यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

फ्लिंटॉफने बच्चन यांना ट्रोल करण्याचा कसा प्रयत्न केला, पाहा…रुटने आज शंभराव्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. त्यानंतर फ्लिंटॉफने बच्चन यांचे हे जुने ट्विट शोधून काढत बच्चन यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. फ्लिंटॉफने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” अमिताभ बच्चन यांचा मी मनापासून आदर करतो. पण आता त्यांचे वय झाले आहे.”

फ्लिंटॉफने बच्चन यांचे पाच वर्षांपूर्वीचे हे ट्विट शोधून काढून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता फ्लिंटॉफला यावर कोण उत्तर देतं, याकडे नक्कीच सर्वांचे लक्ष असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here