कोल्हापूर: सरकारला खूश करण्याच्या भानगडीत पडू नका, नाही तर एक दिवस तुमचे तुणतुणे बंद पडायला वेळ लागणार नाही, असा इशारा नेते, माजी खासदार यांनी सरकारच्या समर्थनार्थ ट्वीट करणाऱ्या सेलेब्रिटींना दिला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापुरात करण्यात आले. यावेळी पोलीस व कार्यकर्ते यांच्यात मोठी झटापट झाली. यावेळी ते बोलत होते. ( )

वाचा:

सरकारचे समर्थन करणाऱ्या सेलिब्रिटींना इशारा देताना शेट्टी म्हणाले, ‘तुम्ही सरकारचे लाभार्थी असल्याने त्यांना खूश करण्यासाठी सरकारचे समर्थन करत असाल, पण अशा भानगडीत तुम्ही पडू नका. आपल्या नावामागे सेलिब्रिटी म्हणून शेपूट आहे, ते केवळ कोट्यवधी लोकांचे प्रेम आहे म्हणून आहे. हे लोक आता केंद्राच्या विरोधात आहेत. तुमच्या विरोधात जायला त्यांना फार वेळ लागणार नाही. त्यामुळे वेळीच शहाणे व्हा’.

पोपटाचा जीव कशात आहे, हे आम्हाला माहीत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष केले जात आहे, ते पाहता आता सरकारची कोंडी करण्याची वेळ आली आहे. यामुळे सरकारचा महसूल थांबवण्यासाठी प्रसंगी आम्ही जीएसटी भवनला घेराव घालण्यात येईल, असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला.

वाचा:

मागे घेण्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी सकाळी दाभोळकर कॉर्नर येथे स्वाभिमानीसह डाव्या आघाडीचे कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी रास्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना बाजूला हटविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठी झटापट झाली. पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर त्यांना सोडून देण्यात आले. या आंदोलनात उदय नारकर, सतीश कांबळे, नामदेव गावडे, चंद्रकांत यादव, गिरीष फोंडे, रघुनाथ कांबळे, प्रशांत आंबी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here