पुणे: भारतरत्न पं. कर्नाटकातून पुण्यात आले. त्यांनी संपूर्ण आयुष्य पुण्यात राहून संगीताची साधना केली. आपल्याकडे राजकारणामध्ये कायम उफाळून येतो, पण या दोन्ही समाजांमध्ये एकसंधता निर्माण करण्याचे कार्य पं. भीमसेन जोशी यांनी केले. मराठी आणि कानडी या दोन संस्कृतींना जोडणारा ते दुवा होते, असे गौरवोद्गार काढत माजी केंद्रीय कृषी मंत्री यांनी पं. भीमसेन जोशींच्या आठवणींना उजाळा दिला.

वाचा:

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘अभिवादन’ या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री , भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे, महापौर , श्रीनिवास जोशी आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात पवार यांनी पं. भीमसेन जोशींच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

वाचा:

‘मराठी-कानडी वाद मिटवणे आजपर्यंत राजकारण्यांना जमलेले नाही. पण संगीताच्या माध्यमातून या दोन्ही समाजांमध्ये संवाद प्रस्थापित करण्याचे काम पं. भीमसेन जोशी यांनी केले आहे. मराठी-कानडी माणसांमध्ये एकसंधता त्यांनी निर्माण केली. आपल्या स्वरांच्या माध्यमातून त्यांनी लाखो रसिकांच्या संगीताची भूक भागवली. त्यांचे स्वर अखंड कसे राहतील, यावर आता भर देणे गरजेचे आहे. पूर्वी औंधच्या संस्थानामध्ये जो संगीत महोत्सव व्हायचा त्यामध्ये सादरीकरण करण्यासाठी भारतातले गायक, वादक इच्छूक असायचे. तीच परंपरा आता पं. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाने घेतली असून यामागे पं. भीमसेन जोशी यांचे संगीतावरचे प्रेम आणि कष्ट आहेत, असे पवार यांनी सांगितले. प्रकाश जावडेकर यांनीही पं. भीमसेन जोशींच्या पुण्यातील मैफलींचे दाखले देत आठवणी जागवल्या. आकाशवाणीकडे भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारीत अनमोल ठेवा आहे. तो ठेवा लवकरच सामान्यांना सहज उपलब्ध होईल, या करता उपक्रम करणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पं. उपेंद्र भट, आनंद भाटे व शाहीद परवेझ यांनी भीमसेन जोशी यांना अभिवादन करत सादरीकरण केले.

वाचा:

‘स्वरभास्कर’ पाठ्यवृत्ती जाहीर

पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी निमित्त केंद्र सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद या संस्थेतर्फे दरवर्षी ‘स्वरभास्कर’ या नावाने पाठ्यवृत्ती देण्यात येणार असून परदेशातून भारतामध्ये शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना ही पाठ्यवृत्ती देण्यात येईल, असे परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबु्द्धे यांनी जाहीर केले. याचबरोबर आकाशवाणीतर्फे घेण्यात येणारे संगीत संमेलन यापुढे पं. भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन या नावाने ओळखले जाईल, अशी घोषणाही करण्यात आली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here