म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्याच्या वेळांवरून गेल्या काही दिवसांपासून व हॉटेलचालकांमध्ये सुरू असलेला वाद थांबवण्यासाठी, अखेर महापालिकेने शनिवारी परिपत्रक जारी करत , दुकाने यांच्या वेळा निश्चित केल्या आहेत. यात हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सकाळी ७ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत, तर दुकाने सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज्य सरकारने २९ जानेवारी २०२१ रोजी हॉटेल, बार, दुकाने व आस्थापनांच्या वेळा निश्चित केल्या होत्या. तसे परिपत्रकही काढण्यात आले होते. सरकारच्या परिपत्रकाचा आधार घेऊन मध्यरात्री १ वाजेपर्यंत हॉटेले सुरू ठेवण्यात येत होती. मुंबई महापालिकेच्या विभाग स्तरावरही मध्यरात्री १ वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र तरीही रात्री ११ वाजल्यानंतर सुरू असणाऱ्या हॉटेलांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि पोलिसांमध्ये खटके उडू लागले होते.

या वादावर पडदा टाकण्यासाठी, अखेर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी शनिवारी परिपत्रक काढून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार, दुकाने यांच्या वेळा निश्चित केल्या आहेत. सरकारच्या परिपत्रकाचा आधार घेत आयुक्तांनी हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार, बँक्वेट हॉल, फूड कोर्ट यांच्या वेळा सकाळी ७ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत, तर दुकानांच्या वेळा सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत निश्चित केल्या आहेत. मद्य विक्रीची दुकाने मात्र सकाळी १० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

प्रतिबंधित क्षेत्रासाठी नियम कायम

प्रतिबंधित क्षेत्रात मात्र विभाग कार्यालयामार्फत घालून दिलेले नियम पाळावे लागतील. हॉटेल व्यवसाय अथवा दुकान चालू ठेवताना कोविडसंदर्भातील सुरक्षित अंतर, मास्क लावणे व अन्य नियम पाळणे बंधनकारक आहे. पालिकेने काढलेल्या या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here