मिळालेल्या माहितीनुसार, या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या यांनाही निमंत्रण धाडण्यात आलं होतं. परंतु, गेल्या वेळचा अनुभव लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एकाच मंचावर उपस्थित राहण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्टपणे नकार दिलाय. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या इतर नेत्यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण धाडण्यात आल्याचं समजतंय.
‘पराक्रम दिवस’ कार्यक्रमात काय घडलं होतं?
गेल्या वेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या ‘पराक्रम दिवस’ कार्यक्रमात ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एकाच मंचावर दिसल्या होत्या. २३ जानेवारी कोलकाताच्या व्हिक्टोरिया पॅलेसमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु, ममता बॅनर्जी या भाषणासाठी माईकजवळ येत असतानाच मंचाच्या जवळून काहींनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. यानंतर, ममता बॅनर्जी यांनी मोदी आणि भाजपला सुनावताच बोलण्यास नकार दिला होता. ‘अशा प्रकारे भाजपकडून एकप्रकारे अपमान केला जात असल्याचा’ आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्यामुळेच, त्यांनी आज हल्दियाच्या कार्यक्रमापासून लांब राहण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय.
पंतप्रधान आसामलाही देणार भेट
पश्चिम बंगालसोबतच पंतप्रधान मोदी आसामलाही भेट देत आहेत. या दोन्ही राज्यांत लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान आज आसामच्या सोनितपूर जिल्ह्याच्या ढेकिआजुली भागाला भेट देतील. चरैदेओ तसंच विश्वनाथ जिल्ह्यांतील दोन वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी ते करणार आहेत. यासाठी जवळपास ११०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. राज्याचे अर्थमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी याची माहिती दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times