देशाचे गृहमंत्री अमित शहा आज सिंधुदुर्गात येत आहेत. त्यातदरम्यान, भाजपच्या नेत्यांनी ऑपरेशन लोटसचे संकेत दिले आहेत. तर, नारायण राणे यांनी अमित शहा महाराष्ट्रात, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. तेव्हा त्यांच्या पायगुणाने हे सरकार जावे आणि एक चांगले, कर्तबगार आणि लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे सरकार महाराष्ट्रात यावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. नारायण राणेंच्या या वक्तव्यावरुन शरद पवार यांनी सरकारची बाजू सावरली आहे. ते बारामती येथे प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते.
वाचाः
नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत. पण ते असे विनोद करतात, हे मला माहिती नव्हते. त्यांच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे. नारायण राणेंच्या वक्तव्याकडे त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही, असा मिश्लिक टोला पवारांनी लगावला आहे. टीव्ही ९नं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
वाचाः
दरम्यान, नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शाह आज कोकणात येणार आहेत. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times