सिंधुदुर्गः केंद्रीय गृहमंत्री आज कोकण दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन होणार आहे. शहा यांचा आजचा महाराष्ट्र दौरा महत्त्वाचा मानला जातोय. यांनीही राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावो, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर पु्न्हा एकदा नारायण राणेंनी मोठे संकेत दिले आहेत.

‘आत्ताच जे सरकार आहे ते जावं असं जनतेलाच वाटतं. या सरकारने महाराष्ट्रासाठी विकासात्मक असं काहीही वर्षभरात केलं नाही. राज्याची तिजोरी खाली आहे आणि ही तिजोरी भरण्यासाठी सरकार प्रयत्न करत नाहीये. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत आणि दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतायेत. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, सातबारे कोरे केले नाहीत. म्हणजेच शेतकऱ्यांची फसवणूक हे सरकार करत आहे,’ असं राणेंनी नमूद केलं आहे.

‘आज उद्योगधंदे बंद आहेत, बेकारी वाढत आहे. बहुतेक सर्व क्षेत्र आज बंद होत असताना हे सरकार काहीच प्रयत्न करत नाहीये. राज्याला पिछाडीकडे घेऊन जाणारं हे सरकार लवकरात जावं अशी इच्छा मी व्यक्त केली, असं स्पष्ट करतानाच हाच मुहूर्त योग्य आहे,’ असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

‘या आघाडीला इंजिन कुठे हेच कळत नाही त्यामुळं या आघाडीत कधीही बिघाडी होईल. ही आघाडी काही जनता किंवा महाराष्ट्रासाठी सत्तेल आलेली नाहीये. ती वैयक्तिक स्वार्थासाठी सत्तेत आली आहे. शिवसेनेनं हिंदुत्व गुंडाळून फक्त मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड केली आहे. त्यामुळं ही आघाडी दीर्घकाळ टिकेल,’ असं मला वाटतं नाही, असंही त्यांनी नमूद केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

‘मी भाजप पक्षात आहे. भाजपचा खासदार आहे. त्यामुळं हा पक्ष सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील असणं, माझं काम आहे. आपल्या महाराष्ट्रात भाजप सत्तेवर यावा, असं मनापासून मला वाटतं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच, आघाडीत बिघाडीचा मुहूर्त कधी असं विचारल्यावर त्यांनी मुहूर्त सांगायचा नसतो,’ असंही ते म्हणाले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here