‘महाविकास आघाडी सरकार हे तीनटाकी ऑटोरिक्षा सरकार’
या वेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार असा करत सरकारवरही जोरदार टीकास्त्र सोडलं. राज्यात तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार तयार झाले असून या ओटोरिक्षाचे प्रत्येक चाक वेगवेगळ्या दिशेला जात आहे, असे शहा म्हणत सरकारमधील तिन पक्षांमध्ये समन्वय आणि एकवाक्यता नसल्याचे शहा यांनी सूचिक केले.
…तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती- अमित शहा
अमित शहा यांनी भाजप नेते यांच्या सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.
अमित शहा यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका करताना पुढे म्हटले की, तुम्ही म्हणता की मी बंद खोलीत वचन दिले. मात्र मी बंद खोलीत कधीही वचन देत नसतो, तर खुलेआम वचन देतो. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही. तुमच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती असेही शहा पुढे म्हणाले.
राणेंचा सन्मान कसा करायचा हे भाजपला चांगले माहीत आहे- शहा
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी भाजप नेते, खासदार नारायण राणे यांचे तोंड भरून कौतुक करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे. अन्यायाविरुद्ध पाय रोवून उभा राहणारा नेता म्हणजे नारायण राणे हे असून जेव्हा अन्याय झाला तेव्हा राणेंनी प्रतिकार केला. अन्याय झाल्यानेच त्यांचा प्रवास वळणावळणाने झाला, असे सांगतानाच राणे यांच्यासारख्या नेत्याचा सन्मान कसा करायचा हे भारतीय जनता पक्षाला चांगले माहीत आहे, असे म्हणत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times