हनाई: सीमेजवळ क्षेपणास्त्र तळ उभारण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. ‘साउथ चायना सी न्यूज’ या ‘एनजीओ’ने या संदर्भात उपग्रहीय छायाचित्रे ट्वीट केल्यानंतर व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत चौकशी करण्यात येईल, असे सांगितले आहे.

व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या ली ती तू हँग यांनी सांगितले, की या माहितीची पडताळणी करण्यात येईल, असे सांगितले. व्हिएतनाम सीमेपासून वीस किलोमीटर अंतरावर हा तळ जवळपास पूर्ण क्षमतेने तयार झाल्याचे उपग्रहीय छायाचित्रांतून दिसत आहे. चीनच्या ग्वांक्शी प्रांतातील निंगमिंग काउंटीमध्ये हा तळ आहे. या ठिकाणी हेलिकॉप्टरचा तळही उभारला जात असल्याची माहिती आहे. लष्करी धावपट्टीवर सहा लाँचर दिसत आहेत. चीनच्या हवाई दलाच्या बॉम्बर्सनी दक्षिण चीन समुद्रामध्ये ‘यूएसएस थिओडोर रूझवेल्ट स्ट्राइक ग्रुप’वर मॉक हल्ला केल्याची घोषणा चीनने केल्यानंतर आठवड्याभरात हे वृत्त समोर आले आहे.

वाचा:
भारत आणि व्हिएतनाममध्ये मैत्री संबंध चांगले होत आहेत. व्हिएतनामच्या पंतप्रधानांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एका शिखर परिषदेत सहभागी झाले होते. लडाखसह अरुणाचल प्रदेशच्या भूभागावर चीन दावा सांगत आहे. मागील वर्षी मे महिन्यात चिनी सैन्याने गलवान खोऱ्यात घुसखोरी केली होती. भारतासोबत हिंसक संघर्षही झाला. अरुणाचल प्रदेशमध्ये भारत दावा करत असलेल्या भागात चीनने एक गावच उभारले आहे. तर, दुसरीकडे दक्षिण चीन समुद्रातील हद्दीचा वादही सुरू आहे.

वाचा: वाचा:
चीनने दक्षिण चीन समुद्र भागावर आपला दावा सांगितला असून व्हिएतनाम व इतर देशांसोबत चीनचे संबंध ताणले आहेत. चीनच्या आक्रमक विस्तारवादी भूमिकेचा व्हिएतनामलाही त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत-व्हिएतनामची मैत्री अधिक महत्त्वाची असल्याचे जाणकार सांगतात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here