पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरहून कार (क्र. एमएच 07-एबी 5610) कोल्हापूरहून पुण्याकडे जात होती. दुपारी दीड वाजण्याच्या सुमाराला ही कार वहागांव (ता. कराड) गावच्या हद्दीत आल्यानंतर ही कार अतिशय वेगात असल्याने चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. ही वेगवान कार महामार्ग ओलांडून पुण्याहून कोल्हापूरकडे जाणार्या लेनवर जाऊन तिने एका वाहनाला दोरदार धडक दिली. या अपघातात तिघे जागीच ठार झाले. तर, एकाचा त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला. तर या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
अपघात ग्रस्त कार अतिशय वेगवान असल्याने अपघातानंतर या कारचा चेंदामेंदा झाला. यामुळे अपघातानंतर कारमधील पाच जणांपैकी कोणालाही बाहेर पडता आले नाही. पाचही जण कार मध्येच अडकून पडले होते. कार सर्व बाजूंनी दबली गेल्याने कारमधून अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times