ठाकरे कुटुंब नेहमीच खरे बोलते. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांमध्ये त्यात ५०-५० चे सूत्र ठरलेले होते. अमित शहांनीच हे सूत्र घोषित केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीतच ही फसवणूक झाली. ही फसवणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहन झाली नाही, म्हणूनच त्यांना पुढील पाऊल उचलावे लागले, असे अरविंद सावंत म्हणाले. जेव्हा विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा वाद झाला तेव्हा शहा हरियाणाला गेले?. अशा वेळी त्यांनी मुंबईला यायला हवे होते. असे असताना मग ते मुंबईत येऊन त्यावर का बोलले नाहीत?, असा सवालही सावंत यांनी केला.
भाजपवर केले प्रहार
भाजप हा सर्वात मोठा पक्ष असला तरी हा पक्ष सर्व राज्यात फोडाफोडीचे राजकारण करत आला आहे. सत्तेसाठी हा पक्ष काहीही करत असतो. बिहारमध्ये आपल्या हातातून सत्ता जाईल हे भाजपलामाहीत होते. या बरोबरच त्यांना इतर कुणी पाठिंबा द्यायलाही तयार नव्हते. हे पाहता त्यांना माघार घ्यावी लागली आणि नितीशकुमारांना पाठिंबा द्यावा लागला, असा टोलाही सावंत यांनी भाजपला लगावला.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यात मिशन कमळ यशस्वी होणार नाही- सावंत
कितीही प्रयत्न केले गेले तरी राज्यात मिशन कमळ यशस्वी होणार नाही. ठाकरे सरकार पूर्ण कालावधी पूर्ण करेल, असा ठाम विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. भाजप नेते नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील कार्यक्रमाला लोक कोठून आले होते, याची जरा माहिती घ्या, असेही ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times