कारंजा विधानसभा मतदारसंघात आयोजित आढावा बैठकीत जयंत पाटील बोलत होते. देवेंद्र फडणवीस हे राज्य सरकारला असा सल्ला देत आहेत, मात्र केंद्र सरकारने अजूनही राज्याच्या जीएसटीचा परतावा दिलेला नाही, याची आठवणही जयंत पाटील यांनी यावेळी फडणवीस यांना करून दिली.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ‘राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा’ आयोजित केला आहे. आपल्या या संवाद दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात विदर्भातून केली आहे. पाटील यांनी आतापर्यंत एकूण आठ जिल्हयामध्ये तालुका आणि विधानसभा मतदारसंघात जात कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित केल्या आहेत. या संवाद दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी इतर पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देखील करत आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
‘पंतप्रधान मोदींना लागलाय हुकूमशाहीचा रोग’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हुकूमशाहीचा रोग लागला असल्याची घणाघाती टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे. याच कारणामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचेही ते म्हणाले. पेट्रोलचे दर शंभरीच्या आसपास पोहोचले आहेत, असे सांगताना त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावरही टीकास्त्र सोडले. आपल्या देशाच्या अर्थमंत्री प्रचंड विद्वान आहेत, असे ते म्हणाले. पेट्रोलवर कर लावा आणि महसूल जमवा हेच केंद्र सरकारचे धोरण झाले आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times