खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत हे उत्तर दिले आहे. राऊत आपल्या ट्विटमध्ये लिहितात, ‘सन १९७५ मध्ये रजनी पटेल यांनी आणि ९० दशकात मला वाटतं की मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल असे भाकीत केले होते. पुन्हा सन २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील असेच म्हटले होते आणि दोन्ही वेळेस शिवसेना अधिक ताकदीने पुढे आली! जय महाराष्ट्र.’
काय म्हणाले होते अमित शहा…?
सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार असा केला. राज्यात तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार तयार झाले असून या ओटोरिक्षाचे प्रत्येक चाक वेगवेगळ्या दिशेला जात आहे, असे ते म्हणाले.
‘…तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती’
शिवसेनेला बंद दाराआड मुख्यमंत्रिपदाचे वचन देण्याच्या मुद्द्यावर देखील त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, तुम्ही म्हणता की मी बंद खोलीत वचन दिले. मात्र मी बंद खोलीत कधीही वचन देत नसतो, तर खुलेआम वचन देतो. मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेला मी असे कोणतेही वचन दिलेले नाही. पंतप्रधान मोदी यांची मोठी पोस्टर्स लावून शिवसेनेने तत्वासाठी मते मागितली. त्यावेळी आम्ही मंचावरून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील असे सांगत होतो. त्यावेळी मात्र शिवसेना काहीच बोलली नाही. शिवसेनेने नंतर दबाबाजी केली.
क्लिक करा आणि वाचा-
शिवसेनेवर टीका करताना शहा पुढे म्हणाले की, शिवसेनेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्ता मिळवली. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही. जर का आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times