यांच्यावर अलीकडेच एक शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे काही काळासाठी त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतला होता. परंतु सोशल मीडियावर लोक त्यांना ट्रोल करत होते, ज्याचं त्यांनी आता उत्तर दिलंय.
मालिकेमध्ये अशक्त दिसत असल्याने घनश्याम यांना ट्रोलर्स सोशल मीडियावर ट्रोल करत. ते त्यांचं आजारपण लपवत आहेत असा आरोप करत. एवढंच नाही तर, लोक त्यांच्या कपड्यांवरूनदेखील त्यांना बोल लावत होते. पण आता टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी ट्रोलर्सना उत्तर दिलं. ते म्हणाले, ‘काही लोक ज्येष्ठ कलाकारांबद्दल असंवेदनशील असतात. मी लोकांना विनंती करतो की, माझ्याबद्दल वाईट पसरवू नका. जर मी या भूमिकेसाठी योग्य नसतो तर निर्मात्यांनी मला ती दिलीच नसती. मी वाचलं की लोक माझ्या कपड्यांवरून मला बोलतात. ज्यांच्याकडे काही काम नसतं, तेच असं बोलत असतात. मला अशा गोष्टींनी काही फरक पडत नाही. मी या वयातही काम करतोय यातचं मी आनंदी आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘एक दिवस सगळेच म्हातारे होणार आहेत. त्या वयात अनेक आजारही होतात. देवाच्या कृपेने मी कर्करोगापासून पूर्णपणे मुक्त झालो आहे. मी १० डिसेंबरला तारक मेहताचं चित्रीकरण केलं आणि मी या मालिकेचा भाग असणार आहे. माझ्या आजारपणाबद्दल मलाही कळलं नाही. माझ्या गळ्यातून आठ गाठी काढण्यात आल्या. ते ऑपरेशन चार तास चाललं पण मी आता बरा आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times